मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · दुडुदुडु धावत येरे कान्हा

 

दुडुदुडु धावत ये रे कान्हा गोजिरवाणा।।धृ।।


अजून किती रे वेळची झाला। तापत भानू तो वरी आला।
उठी उठी मन मोहना रे कान्हा गोजिरवाणा।।१।।


मंगल उठणे स्नान घालीतो। दही भाताचे भोजन देतो।
जेवी जेवी मनमोहना रे कान्हा गोजिरवाणा।।२।।


सवंगडी येरझारा घालीती। धेनु वत्से ती हंबरती।
घेउनी जा राणा रे कान्हा गोजिरवाणा।।३।।


दास म्हणे रे माता भोळी। भेटेल केव्हा तो वनमाळी।
भक्त सख्या रमना रे कान्हा गोजिरवाणा ।।४।।