घेई झोप प्रभू आता । हालवी अनुसया माता ।।
थकले गाणे तूज गाता । तु श्रीदत्ता । झोप घेई आता ।।धृ।।
झाली रात्र चहुकडे । कुठे ना पक्षी आता उडे ।।
आला चंद्र ढगाकडे । फांकले तेज चहुकडे ।।
चमके नभी तारे आता । तु श्रीदत्ता । झोप घेई आता .... ।।१।।
झोपले मानव हे सारे । करुनी काम धंदा त्वरे ।।
झोपले पशू पक्षी सारे । लागले मंद गती वारे ।।
झोपले बालक स्तन पीता । तु श्रीदत्ता । झोप घेई आता .... ।।२।।
गाती ऋषी मुनी रोज । करुनीया पुष्पाची शेज ।।
प्रार्थीतो दास कृष्णदास । करी तव चरणाची आस ।।
ठेउनी कृपादृष्टी आता । तु श्रीदत्ता । झोप घेई आता .... ।।३।।