मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · जय सुखाब्धी सुखपरधामा

जय सुखाब्धी सुखपरधामा ।
आरती करू परब्रह्मा ॥धृ.॥

 

जो पराहूनि जो परूता । अवरामध्ये ज्याची सत्ता । जो ज्ञान शक्तीचा दाता ।
अवरामध्ये ज्याची सत्ता । जो ज्ञान शक्तीचा दाता ।औट मात्रेच्या वरुता ।
निर्मल गांविच्या राहता । आवडलांसी माझ्या चित्ता । कर जोडूनिया प्रणिपाता ।
विनवितो चरणी माथा । मी रंक कोणत्या कामा ॥१॥

 

बहू जन्म घेतो प्राणी । जाहलो दुःखी तुज वांचुनी । शिव, विष्णु पद भोगुनी ।
क्षिराब्धी आलो पाहुनी । नसे थारा तुज वांचोनी । गाई गोपाल वृंदावनी ।
उद्धरीले जडजीव प्राणी । विनवितो श्रीचक्रपाणी । तू वेदशास्त्र अगमा ॥२॥

 

गोकुळी यदुकुलवंशी । जन्मले हृषीकेशी । वसुदेव देवकी पासी ।
पहुडले बहू सायासी । झाला आनंद नरनारीशी । दुंदुभी वाजे आकाशी ।
आले सुरवर दर्शनासी । पुष्प वर्षती आकाशी । धन्य गोकुळ नगरी महिमा ॥३॥

 

जय चिदानंद आनंदा । ओवाळु बाल मुकुंदा । नित्य घडो मज ऐसा धंदा ।
फळ पत्र पुष्प सुगंधा । उद्ध कापूर तुज गोविंदा । करू आरती चरणारविंदा ।
मम याविण वास्तव छंदा । केली प्राप्ती राधेनंदा । शिवबा म्हणे सुख दे आम्हा ॥४॥