मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · गोकुळच्या कान्हा

गोकुळच्या कान्हा, आरती सुंदरा मनमोहना ॥धृ॥

धरी जो अवतार यदुकुळवंशी, मथुरापुरवासी

सुखवेध फार गवळ्याशी, तनुशाम विलासी

हसे खेळवी मधुसूदना ॥१॥

 

धन्य यशोदा नंदमंदिरी, परब्रह्म मुरारी

खेळी क्रीडता दैत्य संहारी, निजभक्त उद्धरी

मुनिवर वर्णिती जगजीवना ॥२॥

 

निर्गुण निरंजन ब्रह्मचारी, येतो बुधवारी

ऐसे विनंता वेदचारी आगमादिक भेरी

झाला संतोष त्रिनयना ॥३॥

 

ब्रह्मा वंदितो पाद पद्मासी, रवि सोमकाशी

फणीवर वर्णितो व्दैं जिव्हासी, ऋषिवर म्हणताती

फणीवर श्रमला शेषराणा ॥४॥

 

दासा रक्षी करुणावंता, सगुणा गुणवंता

द्या अभय शरणागता, मज संकटी पाव आता

कृपा करावी श्रीकृष्णा ॥५॥