मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · ओवाळा ओवाळा कृष्णसावळा

ओवाळा ओवाळा कृष्णसावळा । भाव पुष्प झेला अर्पा घननीळा जय श्रीगोपाळा ॥धृ॥

 

पंच प्राणाचा तबक केला जमवून । त्रिगुण गुणाच्या वाती केल्या घोळून । जय श्रीगोपाळा ॥१॥

 

ज्ञानज्योती लावून आरती करी धरून ज्ञान । प्रकाश पडला वस्तू आली दिसून । जय श्रीगोपाळा ॥२॥

 

व्यास भूपती संता म्हणतो प्रार्थून आरती । ओवाळून मिळवा चित्घन । जय श्रीगोपाळा ॥३॥