मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · धन्य धन्य हे गोकुळ

धन्य धन्य हे गोकुळ, झाले उद्धरणासी मूळ ॥धृ॥

धन्य यशोदा सुंदरी, परब्रह्मा नंदाघरी ।

अवघे तारियले गोकुळ ॥१॥

 

आडवा घेऊनिया यशोदा, पान्हा पाजी परमानंदा ।

घेई अमृताची चूळ ॥२॥

 

जांभई देता तो श्रीहरी, त्रिभुवन दाविले उदरी ।

झाली यशोदा व्याकुळ ॥३॥

 

पालखा निजविला श्रीहरी, जडित चांदवा कुसरी ।

परियंदतसे मंजूक ॥४॥

 

केशव म्हणे गवळ्या घरी, रांगत खेळे तो श्रीहरी ।

पायी घागरिया खुळखुळ ॥५॥