मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीकृष्ण महाराज

आरती · जयदेव जयदेव जयजी गोपाळा

जयदेव जयदेव जयजी गोपाळा । सुदर्शन सुशोभित वैजयन्ती माळा ॥धृ॥

 

प्रातःसमयी द्वारी गौरक्षण मेळा । घेऊन काठी रोटी विनविती गोपाळा ।

उठ उठ बापा पितांबर वेष्टी कर्णी कुंडल शोभे रत्ने श्रीमुगुटी ॥२॥

 

मृग नेत्री अंजन लेऊन वनमाळी । केशर कस्तुरी उटणे अर्चित करकमळी ॥३॥

 

उठोन स्वामी कट पितांबर कसील । गोरक्षक घेऊन वृंदावनी गेला ॥४॥

 

भक्तांसी प्रतिपाळी वाचा त्रिभुवनी नाना लागत चरणी नेई निजसदनी । जयदेव जयदेव ॥५॥