अवधूत प्रभूराया, जय जय अवधूत प्रभूराया ।
वंदीन तुमच्या पाया पाया ॥धृ.॥
ऋषीवंशी प्रभु अवतरलासी । भक्त तारावया ॥१॥
परमार्गासी आदी गुरु जो । तू श्री दत्तात्रेया ॥२॥
खांद्या कावड पारधी वेष । त्रिताप जातील विलया ॥३॥
सहा, चार, अठरा विनविती तुजला । श्रमली वेदमाया ॥४॥
कुमारांकित मुनि कृष्ण सुधाकर । संतुलागे पाया ॥५॥