मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीदत्तात्रय प्रभू

आरती · तो श्रीदत्त, प्रभूसमर्थ

तो श्रीदत्त, प्रभूसमर्थ, कृपावंत, राज्य करितो सह्याद्रि पर्वती ।
चला मिळूनिया जाऊ स्वामीला करू जी आरती ॥धृ.॥

अव्यक्तीहूनी व्यक्त झाला माझा दातार ।
चहुयुगामध्ये क्रीडा करीतो पर्वतावर ।
दंडकमंडलू विभूती चतुर्नी कासे पितांबर ।
जटाजूटमंडित शोभती श्रीमुगुटावर ।
अनंतशक्ती, पुढे खांद्यावरती, कावड घेती, जडा चेतना, संबंध देती, नेती निज प्राप्ती ॥१॥

अनंत सृष्टी हिंडता मला श्रम आला ।
मनुष्य जन्मांमध्ये येऊनी नाही लाभ झाला ।
ज्ञान देऊनी चक्रपाणि टाकोनिया गेला ।
विखो सेविला म्हणुनी माझी खंत आली त्याला ।
खंती धरुनी, अंत:करणी, चक्रपाणि, गेले टाकुनी, निशीदिनी तुज ध्याती ॥२॥

आशा मनशा दुष्ट कल्पना यांच्या संगतीनं ।
या चवधीच्या पायी ग झाली जीवत्वाची हानी ।
काम क्रोध मद मत्सर रिपुला शरण जाऊन ।
अधःपात बुडालों असा मी कर्माचा हीन ।
कर्म हीन, म्हणून शान, अधोमितनं, फसलो येऊन, पडलो अधोगती ॥३॥

सहा चार दहा आणि पहा चवदा चौसष्ट ।
इडा पिंगळा उन्मनी तंतू मार्गाची वाट ।
बुद्धी शहाणी अवघे मिळोनी केला एकवट ।
तुमच्या ग पायी हा जीव चुकला कैवल्याची वाट ।
तुम्ही ग याला, या जीवाला, नेऊ न घाला, पर्वताला, दत्त शिखराप्रती ॥४॥