मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीदत्तात्रय प्रभू

आरती · चहुयुगी श्रीदत्तात्रेया नमन तुला

 

चहुयुगी श्रीदत्तात्रेया नमन तुला ॥धृ॥

बद्रिकाश्रमी पुराण कथिसी, नित्य काशीचे स्नान करिसी ।
कोल्हापुरीची भिक्षा घेसी, पांचाळेश्वरी भोजन करीसी ।
देवदेवेश्वरी झोपाया, स्थान तुला । चहुयुगी... ॥१॥

गारगोटीचा भात शिजवूनी, त्रिदेवासी बालक करुनी ।
अधीन केले माते लागुनी, रत्नजडित पाळणा घालुनी ।
झोका देतेसे अनसूया, जसा तुला । चहुयुगी... ॥२॥

पाचशते अपूर्व वारुला, शांतिविले त्वा ऋषी रुचिकाला ।
वनसाळीचा भात शिजवला, भोजन केले वनदेवाला ।
ऋषीजन मेळा पंगतीला, घेऊनिया । चहुयुगी... ॥३॥

देवलऋषीने लिंग स्थापिले, वाढत वाढत नभी पोहचले ।
ब्रह्मादिकासी संकट पडले, चतुराक्षरी त्वा खचुनी पाडिले ।
औट हात शिरी ठेऊनिया, धरणीला । चहुयुगी... ॥४॥

आकाश पंथी नाथ झोळी, खाली पाडिली त्वा वनमाळी ।
गोरक्षाचा मद प्रक्षाळी, धन्य धन्य बा ती मंत्रावळी ।
किती गाऊ तव गुण सखया, बहुमोला । चहुयुगी... ॥५॥

परशुराम कोरी भूमिका, दाखवुनी मग दहनरेणुका ।
त्रिताप हीन केले अरळका, वर शंकराचार्या निका ।
दिधला तक्त स्थापाया, प्रेम तुला । चहुयुगी... ॥६॥

ज्ञान देऊनी यदुभूपाला, पोहचविले त्या अढळ पदाला ।
ऐसा बाप्पा तू कनवाळा, प्रेमदास म्हणे भाव भोळा ।
वंदन करितो शुभ पाया, शरण तुला । चहुयुगी... ॥७॥