जयदेव जयदेव जय अत्रिकुमारा ।
पंचारती ओवाळू दत्त दिगंबरा ॥धृ॥
दीनवत्सल, कृपाशील, कर शीतल, वदनी ।
श्रीसह्याचळ, निर्मळ, पाहूनी स्थळ, नयनी ।
तनु सोज्वळ, मुख वर्तुळ, फांकत किळ दशनी ।
कर कमळ, नाशित मळ, पद्युगळ, ध्यानी ॥१॥
सुरनायक, जगपाळक, वरदायक, दाता ।
गणनायक, चित्तरंजक, भवपतिक, हरिता ।
जनतारक, मनमोहक, हित स्वार्थ करीता ।
नट लुब्धक, भ्यरुत्यरक्षक, वपु नागर धरीता ॥२॥
दुःखहरण, सुखकारण, पदपावन, करितसी ।
मधुसूदन, ऋषिनंदन, प्रभूधावून येसी ।
निज दर्शन, मज कारण, सुखसाधन देशी ।
तम सोडून, देह दौडून, चित्तार्पूनी, तुजशी ॥३॥
निज किंकर, पदी तत्पर, दुःख निस्तरसी सर्वै ।
निज माहेर, गुणसागर, रूप सुंदर ध्यावे ।
मद मत्सर, कृत जर्जर, शुद्धांतर भावे ।
करूणाकर, नटसागर, सत्वर तूपावे ॥४॥
तू मूळ बीज, ऋषि आत्मज पद पंकज भावी ।
विनवी तुज, माहेर मज, चरणांबुज, दावी ।
बिंदू आत्मज, करी आरती, संतु तुज, विनवी ।
मागत निज, सेवित रज, सुमती मज, द्यावी ॥५॥