मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

भजन

भजन · अग चल चल चल जाळीच्या देवाला

(चाल: हिल पोरी हिल )

अग चल चल चल जाळीच्या देवाला
चक्रधराच्या भेटीला गं, स्वामीरायाच्या भेटीला
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।धु।।

जाळीच्या देवाला ग तीर्थक्षेत्राचे ठिकाण
तीर्थक्षेत्राचे ठिकाण ग चक्रधराचे हे स्थान
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।

जाळीच्या देवाला ग चक्रधराचे मंदीर
चक्रधराचे मंदीर ग साधूसंताचे माहेर
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।

जाळीच्या देवाला ग भक्त येती दर्शनाला
भक्त येती दर्शनाला ग प्रसाद सूटती पौर्णिमेला
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।

जाळीच्या देवाला ग चारी बाजुनी डोंगर
चारी बाजुनी डोंगर ग मधी सावद्वाराचे मंदीर
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।

कर जोडूनी देवकी बोले सेवा तुमची नित्य घडो
सेवा तुमची नित्य घडो पूर्ण पदराला पडो
अग चल चल चल जाळीच्या देवाला ।।