मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

भजन

भजन · भाव असले जर का आपूल्या अंतरी

( चाल: भाव असले जर का )

भाव असले जर का आपुल्या अंतरी
भेटेल श्रीहरी आपुल्या मंदीरी ।।धृ।।

भाव होता जैसा द्रौपदीच्या मनी
धावत आले तीथे आले चक्रपाणी
तैसीच कृपा करा गिरधारी ।।

भाव होता जैसा अर्जुनाच्या मनी
रथावरी सारथी झाले चक्रपाणी
तैसीच कृपा करा प्रभू मजवरी ।।

भाव होता जैसा सुदामाच्या मनी
सुवर्णनगरी दिली चक्रपाणी
तैसीच कृपा करा प्रभू मजवरी ।।

देवकी दासी बोले तुला श्रीहरी
दर्शन देवोनी राखावी लाज
तैसीच कृपा करा प्रभू मजवरी ।।