मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

भजन

भजन · धाव लवकरी भक्ताच्या हरी धावरे

( चाल- नाच रे मोराआंब्याच्या बनात )

धावरे कृष्णा हस्तिनापूरात धावरे कान्हा धाव
कौरवानी डाव मांडला रे, पांडव सभेसी बसले रे
दृष्टांनी फासा फेकला रे
धाव लवकरी भक्ताच्या हरी धावरे ।।

दृष्टाने खेळ आता खेळला रे
पांडव राज्य हारले रे
बोले दूर्योधन आता तुमची नारी
संकटाच्या वेळी धाव वनमाळी, धावरे ।।

पांडवाने मौन धरले रे
द्रोपदी दृष्टाने घेरली रे
दृष्ट दुष्यासन ओढी पदराला
भक्ताच्या हरी धाव लवकरी, धावरे ।।

द्रोपदी संकटी पडली रे
हरीला अंतरी कळले रे
शालूचा ढीग आता पडलारे
भक्ताच्या हरी धाव वनमाळी, धावरे ।।

देवकी तूला आता बिनवतेरे
रक्षण माझे कर रे
संकटाच्या वेळी धाव वनमाळी, धावरे ।।