चाल : दर्शन देर, देरे भगवंता
दर्शन देर, देरे नंदलाला
अशी आहे तुझी अगाध लिला
दर्शन देर, देरे नंदलाला ।।धू।।
देवकीच्या उदरी अवतार धरीले
यशोदेसी तूने मातृपद दिधले
अशी आहे तुझी अगाध लिला ।।१।।
यमुनेशी तूच वरदान दिधले
कालियाशी तूच वरदान दिधले
यमुनेशी तूच खेळ खेळले
अशी आहे तूझीअगाध लिला ।।२।।
इंद्राचे तूच गर्व हरीले
गोवर्धन पर्वत करंगळी धरीले
गोकुळाचे तूच रक्षण केले ।।३।।
सुदामाशी तूच नगरही दिधले
नगर देऊनी शांतही केले
राधेशी तूच मनही दिधले
मन देऊनी प्रेमदान दिधले ।।४।।
संदिपीशी तूने पुत्रदान दिधले
पुत्र शोकतून मुक्तही केले
मिरासाठी तूने विषही पिले ।।५।।
सती द्रौपदीशी तूच वस्त्र पूरविले
पांडवाशी तूच राज्यही दिधले
दुर्योधनासंगे युद्धही केले ।।६।।
कंसासी तूच मोक्षधाम दिधले
भक्तांचे तूच रक्षण केले
देवकी विनवीते तूजला ।।७।।