धन्य धन्य स्वामीया अवधुता योगीया मुनीवरा ।
सकळ साक्षी तू असशी गुरुकुळा, चिद्रुप चिन्मयवरा ।।धृ।।
पुर्ण ब्रह्म परधाम परात्पर, मुनीरंजन अच्युता ।
भवार्णवी बुडता तारी तू, संसृती मुळ छेदका ।।
भक्त लिल्लका अत्रीकुमारा, वससी सैह्यागीरी ।
सकळ जना पावसी कृपाळा प्रेम देई झडकरी ।।
अगम्य अगोचर अनाम गुणमय, अगम्य पूणांतीता ।
देववृंद मुनीवृंद चिंतीती, पार नसे तव रुपा ।।
बद्रिकाश्रमी तत्त्वज्ञान तु कथिसी योगी जना ।
स्नान काशीचे सारुनी राया, आत्मतिर्थी भोजना ।।
मातापुर हे पवित्र स्थान, नीद्रिता वारीसी ।
प्रेम सुरक्षाचा दुर्ग उगवला, ठाव देई मजसी ।।
हे कल्पद्रुमा अनुपमा, संकष्टी पाव आम्हा ।
भवरुपी ऋषीकुलोत्पन्ना, सुंदरा प्रेम धामा ।।
दास अमृता ठाव द्यावया, विसरु नको प्रभुवरा ।
भक्त वत्सला ब्रीद तुझे हे, वदती गुण गंभीरा ।।
हे अत्री सुता गुरु दत्ता, पावसी जना अवधुता प्रभुवरा ।
हे पाप ताप दैन्याते, वारी भवहरी दुःखाते प्रभुवरा ।।
करुणाब्धि करुणावंता, हे प्रभो दयाधन त्राता प्रभुवरा ।
कैवल्य सुखाचा धाम, आत्मयाराम सकळ जगतासी ।
अमृतदास चरणासी प्रभुवरा, गोविंद दास चरणासी प्रभुवरा ।।