मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रार्थना, स्तवन

भजन · स्तवन हे जगद्गुरु महाराज

हे जगद्गुरु महाराज ।
सुखाचा दानी प्रेमाचा दानी ।
नादतो सैह्यांचळ स्थळ निर्मळ पाहुनी ।।धृ।।

ऋषी अत्रि पिता अनुसया तयाची जननी ।
तो पूर्णब्रह्म अवतार व्यक्तला अवनी ।

अतिशुभ्र उटी चंदनादी परिमळ भरूनी ।
रेखीला टिळामृत नाभीत मिश्रित करूनी ।

तु प्रेम सुखाचा दानी प्रभुवरा ।
तवपदी ठाव नित्यानी प्रभुवरा ।

मागतो तुला निर्वाणी प्रभुवरा ।
हे भक्त वत्सला ज्ञान धनाचा तरणी ।

अज्ञान तमीत करी प्रकाश तव तेजानी ।
हे जगद्गुरु महाराज सुखाचा दानी ।