जोडते जोडते दोन्ही हात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।धू।।
चक्रधराला आंधोळ घालीते तांब्याच्या धंगाळात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
देवाच्या आंधोळीला दही दुध साखर ।
नेसायला पितांबर ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला उठी मी करीतो ।
अत्तर मिसळते त्यात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला हार मी गुंफते ।
शेवंती मोगरा त्यात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला गंध मी लावीते ।
केशर कस्तुरी त्यात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला विडा मी करिते ।
पान सुपारी नारळ त्यात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला उपहार करीते ।
पाची पक्वान्न त्यात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।
चक्रधराला दंडवत घालीते ।
निष्काम भाव मनात ।
देवा मला घ्यावे आता पदरात ।।