मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रार्थना, स्तवन

आरती · जय जय दनुचारी देव देवा मुरारी

जय जय दनुचारी देव देवा मुरारी ।
तुज विन भव गारी कवण दासाशी तारी ।
निशी दिनी वत मारी पावलो दंडभारी ।
चरण शरण शौरी दैन्य माझे निवारी ।।

तुजविन मज देवा रक्षिता कवण आहे ।
सकल जन विसावा बंधु तु बाप माय ।
कवण गत करीशी कवण ठायास नेशी ।
जय जय ऋषिकेशी शीणलो गर्भवाशी ।।