प्रायश्चित
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।धु।।
प्रभो ! राजसी तामसी मी विकारी ।
विकल्पी आणि हिंसकु मीच भारी ।
भुता देवतादि पात्रांचा विक्षोभ झाला ।
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।१।।
कखाई असे मी निंदकु आत्मघाती ।
वरी वर्म स्पर्शी कुटीलादी दोषी ।
परतारकु अंतरी ना जिव्हाळा ।
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।२।।
भके पात्र विरागी मी ज्ञानियाला ।
करी मार्ग द्रोह गुरु ईश्वराला ।
महाप्रसव नित्य नरकासी गेला ।
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।३।।
महा निष्ठुराला जहीना क्रूरांचा ।
सदा भ्रष्ट रे वंचकु तस्करांचा ।
महा दुर्गुणी वेल वाढीस गेला ।
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।४।।
कृपाळु दयाळु औदार्यवंता ।
आभाळहुनी थोर या दोषवंता ।
तुला अधमाचा जरी वीट आला ।
क्षमा कर दयाळा । क्षमा कर दयाळा ।।५।।