मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

भजन

भजन · दे राधे दे माझी बासरी दे

दे राधे दे माझी बासरी दे ।।धृ।।
तूझ्या बासरीचा रंग गोपगोपी झाल्या दंग
तूझ्या बासरीचा नाद मला लागला रे छंद
दे राधे दे माझी बासरी दे ।।१।।

तूझ्या बासरीचा तुरा
गाई गेल्या दुर - दुर
गाई वापस आल्या घरा ।।२।।

तूझ्या बासरीची छाया
आम्हावरी केली माया
तूझ्या बासरीची वाणी
राधा झाली रे दिवाणी ।।३।।

तूझ्या बासरीचा गोंडा
जसा सर्वाचा झेंडा
तूझ्या बासरीची हवा
नाही कळली ब्रह्मदेवा ।।४।।