नामाचा अभिमान नाम आठवा ।
नामेची प्राप्ती जीवा ।
नामे सर्वही सिद्ध चिंतील मनी नामे चढे वैभवा ।
नामे देहिक रोग विघ्न टळती त्रिताप दुःखार्णवा ।
नामे धावुनी देवो ये आठविता जैसा आला पांडवां ॥१॥
नामाचा महिमा अगाध नकळे पापी जीवा अधमा ।
नामाचा जरी नामिया म्हणविसी स्वीकारी पुरुषोत्तमा ।
नामाने तरले बहुत जण ते प्राप्तीसी जे पावले ।
नामातें स्मरती सदा निशिदिनी ते पूर्ण भाग्याथीले ॥२॥
नामे पाप जळे भवाब्धी विटळे शत्रु कदा नातळे ।
आले विघ्न टळे महाभय पळे वागीश्वरे पांगुळे ।
नामाचा महिमा विधीसी नकळे मोक्षापदी जा रुळे ।
ऐसे नाम जपा तुम्ही बहुबळे घ्या मुक्तीचे सोहळे ॥३॥
ज्या नामे पृथ्वी समूळ तरली ते नाम वाचे वसो ।
ज्या रुपे सागरात्मजा समजली ते रुप ध्यानी वसो ।
ज्या पादे फणा काळीया स्पर्शीला तो पाद भाळी ठसो ।
ज्या हस्ते गिरीगोवर्धन उचलिला तो हस्त माथा वसो ॥४॥