मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

पंचावतार नमन

आरती · नाम प्रभूचे स्मरा

नाम प्रभूचे स्मरा, तुम्ही हो । नाम प्रभूचे स्मरा ।
श्रीकृष्णाय नमो नमः ॥धृ.॥

नामाचा महिमा थोर । नासती दोषांचे गिरीवर ।
निवृत्ती त्रय तापांच्या राशी । शांती मिळे अंतरा ॥१॥

नाम स्मरता सुख होये । नामे प्रभू तो वश होये ।
नामाचा नित्य आठव केलेया । तोष होई ईश्वरा ॥२॥

ज्यांचे मुखी नाम सदा । त्यांसी नाही भय आपदा ।
देई प्रभू स्वसुखानुभूती । छेदूनी भव पांजरा ॥३॥