मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

पंचावतार नमन

आरती · नाम तुझे घेता देवा

 

नाम तुझे घेता देवा होई समाधान ।
तुझे पदी लागो माझे तन मन ध्यान ॥धृ.॥

सूत्रधार तू विश्वाचा, तुझे गूढज्ञान ।
कालगतीचे फिरविसी सूत्र ते महान ।
मिळे मोक्ष तुझिया नामे देसी ऐसे ज्ञान ॥१॥

काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई ।
आशा निराशा फेरे जगी ठाई ठाई ।
तूच एक अंतर्यामी तुला सर्व जाण ॥२॥

बंधू मायबापा लागी आस दर्शनाची ।
दत्ता म्हणे एका आता हाक पामराची ।
अल्प बुद्धी माझी देवा आहे भक्त सान ॥३॥