मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीचक्रपाणी प्रभूची

आरती · धूप, दीप, चंदन सुगंध दावुनी

धूप, दीप, चंदन सुगंध दावुनी ओवाळितो तुजला ।
आरती द्वारावतीकारा ॥धृ.॥

जनकाईसाचे भाग्य आगळे । परब्रह्म हे उदरी आले ।
फलस्थपुरच्या पवित्रधामी । प्रगटसी चित्परा ॥१॥

सर्वस्वाचा त्याग करुनी । मातापूरच्या पवित्र स्थानी ।
श्रीदत्तात्रेयप्रभुपासूनी । करी शक्ती स्वीकारा ॥२॥

मातापुराहुनी गमन सारिले । द्वारावती येऊन राहिले ।
क्रीडा करुनी निशिदिनी केले । जीवांचा उद्धार ॥३॥

द्वारावतीला क्रीडे जगदानी । राज्य करितो श्रीचक्रपाणि ।
विद्यादान बावन पुरुषासी । करी स्वामी दातारा ॥४॥

कार्य संपत्ता अवताराचे । निमित्त मानूनी कामाख्याचे ।
पतित उठवी हरिपाळाचे । भरवस पूर नगरा ॥५॥

अशा करुन अनंत लीळा । जीव उद्धारीसी स्वामी कृपाळा ।
दासी मालती तव पदकमला । वंदितसे ईश्वरा ॥६॥