ओवाळू आरती श्रीदत्तराया, वंदन करुनी विनम्र पाया ।।थु.।।
अत्री अनसुया कुशी जन्मुनी । चहुयुगी हे चिरयु असोनी ।
सैह्याद्रि वरती क्रीडा करिती । अमोघ दर्शन देई जीवा या ।।१।।
पूर्णब्रह्मा पर मंगल मूर्ती । जटाजूट शिरी चतुर्भुज ती ।
कोमल कांती चर्चिली विभूति । अवधूत नट धरी जीवोध्दरा या ।।२।।
अनंत जीवाचे दुःख भवबंधन । छेदून देतो सुख ऋषिनंदन ।
यतिमुनी ध्याती सुरगण स्तविती । ब्रह्म हरी हर चैतन्य माया ।।३।।
आनंदघन प्रभू पूज्य जनासी । आदिकारण या परमार्गासी ।
दामोदरमुनी आरती ओवाळूनी । अभिवंदन करी कर जोडूनिया ।।४।।