मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीदत्तात्रय प्रभू

आरती · जय अत्रिकुमारा सुकुमारा

 

 

जय अत्रिकुमारा सुकुमारा । भव दोष क्लेश दुःख ताप हरा ।।धृ.।। 

नीज कृपे ज्ञान दे यदुराया । गोरक्ष बोधी दाऊनी माया । रुचिकासी पंचशते 

अर्पी हया ।।चाल ।।सहस्रार्जुना वर कर दिधले ।।रेणुकजा मही दाऊनी विहिते 

।।करवून शुभ निक्षेप ।।१।। 

 

जगी मान्य करुनी शंकराचार्या । याचका पुरविसी शुभकार्या । 

मदलसा वाचवी शुभभार्या ।।चाल ।।त्रैतापी अरकळ शांतिवला । 

निगधाचार्या पटी स्थापियला । निर्मितसे से परपंथ ।।२।। 

 

काशीश्वर नृपती वचनमाला । दे मान स्नान करी काशीला । 

ले टिळा अक्षता निढळाला ।।चाल ।।बद्रिकाश्रमी मग जावोनी । 

वर्णितसे बहुमत निज श्रवणी ।।ऋषीमुखी पुराण ।।३।। 

 

जंबुकाख्य नगरी करी भिक्षा । पांचाळ पट्टणी कमलाक्षा । मग येणे होय हो 

जग साक्षा ।।चाल ।।आत्मतीर्थ गंगोदरी बसुनी । भोजन सारीतसे नित्यानी । 

गमन करी तेथून ।।४।। 

 

मातापूर शयनी करी निजा । जो वंद्य जगत हरी विधी रूद्रा । जय करुणाघन प्रभु 

परचंद्रा ।।चाल ।।शिवप्रिय बंधु भिद विवितो । वरमती दे मज जयरुप 

स्तवितो । वंश परांडेकार ।।५।।