संसार संगे बहु शीणलो मी ।
कृपा करी रे दत्तराज स्वामी ।।
प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजविण दत्त मज कंठवेना ।।१।।
नाना विकारी स्थिरता न येरे ।
त्याचेनि संगे भ्रमती भलेरे ।।
अपूर्व कार्ये मन हे विटेना । तुजविण दत्ता ... ।।२।।
माया प्रपंची बहु गुंतलो रे ।
विशाल व्याधिमधी बांधलो रे ।।
देहाधिमाने अति रहावेना । तुजविण दत्ता ........ ।।३।।