मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीदत्तात्रय प्रभू

आरती · आरती करू करू दीनदयाळा

आरती करू करू दीनदयाळा  

अत्रि अनसूयेच्या बाळा।।धृ।। 

 

धन्य अवतार अवतार हृषीकेशी, आले बद्रिकाश्रमाशी 

अनसूये करी करी करांजुळासी, जन्म दत्तात्रेयासी 

आनंद झाला।।चाला।।त्रिभुवनी आनंद झाला 

पाताली पन्नकाला, 

दुदुंभी आकाशाला 

सुरवर वर्षती सुमनाला, 

मिळोनिया म्हणती म्हणती ओवाळा  

स्वामी चला सह्याचळा।।१।। 

 

तेथून आले वरदानी, सहस्रार्जुना दे पाणि 

अर्ळकाचे हरले ताप तिन्ही, गोरक्षाशी बोधूनी 

रूचिक ऋषि।।चाला।।तेथ आले रूचिक ऋषि 

शामकर्ण देऊनी त्याशी 

खेळ क्रीडा पारध वेषी  

आली जीवाची जीवाची कणवाळा  

नेवोनि देवी सुखफळा।।२।। 

 

मग स्थापिती स्थापिती रेणुका, जेथे होती कोरी भूमिका 

परशुराम राम पुत्र एका, बाण मारोनी काढी उदका 

पाजी पाणी।।चाला।।पाजी रेणुकेला पाणी 

दिले सरणाशी लावूनी 

आपण जाय तेथोनी 

निघे देवी दहनातूनी 

फिरूनीया पाहे पाहे राम डोळा 

तयासी राहे रूड गोळा।।३।। 

 

चरणचारी चारी पर्वत, सप्त कोसाची गणित 

अवलोकिता सर्व पाप जळत, आले विध्न दूर पळत 

पहा अवतार।।चाला।।चहुयुगी तो अवतार