मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीचक्रपाणी प्रभूची

आरती · जय जय आरती करुनी ओवाळा

जय जय आरती करुनी ओवाळा। प्रभो विभो द्वारावतीकारा।

वंदुनी पदकमलाला। जय जय आरती करुनी ओवाळा॥धृ.॥

 

आनंदमय प्रभु अवतरले जगी, फलस्थपुरी द्विजवंशी।

जनक आणि जनकाईसाकुशी नटुनी मानव वेषी । उभय शक्ती

स्वीकरुनी तयाने उद्धरिले जगताला॥१॥

 

द्वारावतीला वास सदोदित गोमतीच्या तिरी त्यांचा । बावत्र पुरुषा

विद्या देउनी बोध करी अवराचा । खेळ क्रीडा प्रभु करुनीया बहु

दाखवी अनुपम लीळा॥२॥

 

श्री चक्रपाणी कैवल्यादानी ऋषीमुनी ध्याती तयाते । देवी देवता

गुणानुमोदुनी स्तविती नित्य पदाते । धन्य अशा परब्रह्मा पुजुनी वाहु

सुमन माला॥३॥

 

भक्ती निरांजन भाव प्रकाशुनी उजळूनी धूपदिप ज्योती । पंचारती

ओवाळू तयाची आठवुनी मंगल मूर्ती । दामोदर म्हणे समुदायाने

कर प्रणिपात तयाला॥४॥