धूप, दिप, चंदन सुगंध दावुनी ओवाळितो तुजला ।
आरती द्वारावतीकारा ।।धू.।।
जनकाईसाचे भाग्य आगळे । परब्रह्म हे उदरी आले ।
फलस्थपुरच्या पवित्रधामी । प्रगटसी चित्परा ।।१।।
सर्वस्वाचा त्याग करनी । मातापूरच्या पवित्र स्थानी ।
श्रीदत्तात्रेयप्रभूपासूनी । करी शक्ती स्वीकार ।।२।।
मातापुराहुनी गमन सारिले । द्वारावती येऊन राहिले
क्रीडा करुनी निशिदिनी केले । जीवांचा उद्धार ।।३।।
द्वारावतीला क्रीडे जगदानी । राज्य करितो श्रीचक्रपाणि ।
विद्यादान बावन पुरुषासी । करी स्वामी दातारा ।।४।।
कार्य संपत्ता अवताराचे । निमित्त मानूनी कामाख्याचे ।
पतित उठवी हरिपाळाचे । भरवस पूर नगरा ।।५।।
अशा करुन अनंत लीळा । जीव उद्धारीसी स्वामी कृपाळा ।
दासी मालती तव पद कमला । वंदितसे ईश्वरा ।।६।।