आरती करितो तुला मी आज
जय जय गोविंद, जय प्रभुराज ।।धृ।।
अनंतनायक नेमाईसा कुशी, नटुनी मातुळग्रामी ।
रुद्धपुरासी अखंड विचरसी, गुंडम योगीराज ।।१।।
निर्गुण ब्रह्म परात्पर रूपा, अगाध तव गुण महिमा ।
आर्यवेष नट धारण करूनी, पुरवी जनांची काज ।।२।।
साठ जीवांची मूळ अविधा, प्रतिदिनी तू छेदुनिया ।
ब्रह्मपदी पाठची कृमीला, लीळा करूनी सुरराज ।।३।।
अनिमित्त बंधु तू आर्तदानी, परमानंद सुखदाता ।
विनम्र भावे चरण शरण हे, आलो तुला मी आज ।।४।।
जयतु मंगल परम मंगला, देवा मंगल रूपा ।
दामोदर तुज आरती ओवाळी, राख सख्याम मम लाज ।।५।।