मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीगोविंद प्रभूची

आरती · करूया आरती गोविंदप्रभूला 

 

चाल - तुम्ही हो माता पिता तुम्ही हो ... 

 

करूया आरती गोविंदप्रभूला 

विनम्र वंदूनी पदकमलाला ।।धू।। 

अनंतनायक नेमाई उदरी 

मातुळग्रामी अवतार धरी 

ऋचिकपूरी, विचरणकरी, 

जीवोध्दारी, करूनिया लीळा ।।१।। 

 

करी अगोचर अगम्य क्रीडा 

भक्तासाठी तो होऊनी वेडा 

अनिमित्त बंधू, दयेचा सिंधु 

स्वानंद द्याया, अवतार झाला ।।२।। 

 

कृमीते नेई ब्रह्मापदाला 

जीवंत करी मृत बाळाला 

कुणा देई नेत्र, कुणाला पुत्र 

पांगुळ्या पाय वाचा मुक्याला ।।३।। 

 

साठ जीवाची अविधा छेदूनी 

तयासी बसवी अढळासनी 

अगाध लीळा, करूनी वेल्हाळा, 

सुखशांती देई दु:खी जीवाला ।।४।। 

 

आर्यवेष शुभमंगल मूर्ती 

मनी स्मरूनी ओवाळू आरती 

जोडोनी कर, विभो किंकर, 

वंदन करीतो, प्रभूरायाला ।।५।।