मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीचक्रधर प्रभू महाराज

आरती · नमो जय जय देवा चक्रधरा

नमो जय जय देवा चक्रधरा । मंगल आरती योगेश्वरा ॥ ध्रु ॥

चांपेगौर वपू तुझी मुंदर ती । अवलोकून आनंद वाटे चित्ती ।

आलो तुला शरण चरणी अपुंनी मन ।

तुझे पुजन करितो परमेश्वरा ॥१॥

 

गंध टिका कपाळा वरी लावूनी ।

मधु पुष्पांच्या माळा गळा घालुनी ।

हाती हातसरे बांधुनी माजरे ।

शिरी लावितो मधु फुल गुच्छ तुरा ॥२॥

 

भाव पंचारती उजळुनी मनी ।

भक्ति निरांजन दीप पाजळुनी ।

उदक्की धुप लावुनी आमुप ।

तुझ ओवाळितो मी जगदीश्वरा ॥३॥

 

हीन दीन पुजारी तुझा चिमुकला ।

फळ पक्वात्र नैवेह दावीन तुला ।

नम्र अभिवंदुनी दामोदर मुनि ।

करी आरती देवा कमळावरा ॥४॥