आरती ब्रह्मरूपा, चक्रधर स्वरूपा।
आनंद स्वरूपा, आरती ब्रह्मरूपा॥धृ॥
तुझे लागले ध्यान करूनी स्थिर मन।
हृदयी साठविले परमानंदरपा॥१॥
ज्ञान प्रेमासी दिधले जीवासी उद्धरिले।
कैवल्य सुख दिधले यथेच्छ केली कृपा॥२॥
देवादिकासी न कळे मायेचे झाकी डोळे।
तेथ मानव भोळे पाहती पररूपा॥३॥
नागदेवा स्थापून करी रूपासमान।
प्रगटे ब्रह्मज्ञान, जगजेठी अमृपा॥४॥
दास चरणी लोळे ठेवूनी निजभांळ।
मागणे हेची देवा देई शुध्द स्वरूपा॥५॥