मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीचक्रधर प्रभू महाराज

आरती · जय जय चक्रधर स्वामीया

जय जय चक्रधर स्वामीया

वहातो सुमने पाया पाया॥धृ॥

विप्रवंशी प्रभू अवतरलेली, अनुचर तारावया॥१॥

भोगावती स्थळी वेशन धरीले, भक्ती नागांबाया॥२॥

आचार्यांशी योग्य केले, कैवल्यपद द्याया॥३॥

मृत माळी तो कृपे जीववीला, अपूर्व तव लीलाया॥४॥

गोपिराज हा दास नमितो, प्रेम मागे प्रभू पाया॥५॥