मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रात : काळ प्रारंभ

आरती · उठ रे उठ बाप्पा 

उठ रे उठ बाप्पा करी कृपा । निजानंद स्वरूपा ।।धृ।। 

उठोनी स्वामी प्राप्तःकाळी । जटाजूट हे मुगुट झळाली । 

जीव पडले अनाथमेळी । कृपादृष्टीने तू सांभाळी । सखया निजरूपा २ ।।१।। 

अविनाशी तू परात्पर । अलक्ष लक्ष न कळे पार । 

मायेपरता अगोचर । ऐसे बोलती सिध्दांतसार । तटस्थ जाहले अरूपा २ ।।२।। 

चहुयुगी तू स्वामीराया । राज्य करिसी प्रतापी सखया । 

जळचर जडजीव वंदिती पाया । अनाथनाथा करावी दया । 

येऊ दे तुजला अनुकंपा २ ।।३।। 

नाम तुझे हे अनार्जित । नाही अर्जिले मी किंचित । 

दास केशव शरणांगत । पूर्ण करावा माझा हेत । 

तन मन धन अपर्ण तुज बाप्पा २ ।।४।।