मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

प्रात : काळ प्रारंभ

आरती · बाप्पा तू उठ बा 

 

 

बाप्पा तू उठ बा उठ दत्तात्रेया । उठ स्वामीराया । 

जटामुगुट करी नीट माता अनसूया । बाप्पा .... ।।धृ।। 

प्राप्तःकाळ झाला, अरूणाचा उदयो । सुखर ऋषीवरदायक, तिष्ठती रूप पाहाया । 

इंद्रचंद्रादिक आले, पुष्पे ओळगाया । हरिहर ब्रह्मादिक, आली चैतन्यमाया ।।१।। 

मातेचे वचनी, दत्तात्रये उठले । अवलोकिता जीवास, भवबंधन तुटले । 

कल्पकाळीचे दोष, त्यापासून सुटले । 

पवित्र पर्वत पाहता, सैह्याद्री पर्वत पाहता, पापसिंधु आटले ।।२।। 

दंडकमंडलु हाती चर्चुनी, विभुतीचा गोळा । चरणी पादुका लेवा, जा मेरूवाळा । 

जळचर जडजीव पीडले, येऊ दे कळवळा । तत्प तापले निववी, तुजविण कोण वेल्हाळा ।।३।। 

वाराणसीचे स्नान, कोल्हापुरी भिक्षा । गंगेतरी येऊनिया स्वामीची भिक्षा । 

आत्मतीर्थ चरणांकित, तटी मुठीची साक्षा । ध्यानस्थ बैसूनी, स्मरणस्थ बैसूनी, पर्वतासी लक्षा ।।४।। 

अव्यक्तीहनी व्यक्त झाला, प्रार्थिता देव । सैह्याद्री पर्वत पाहता, मनी ठसला भाव । 

ज्याचा जैसा भाव, त्याला तू पाव । मागतो गणेशा, प्रार्थितो परमेशा, दे निजपदी ठाव ।।५।।