प्रभातकाळी जननी यशोदा । उठी उठी बा म्हणे मुकुंदा ।
गोपाल येती तुजला बाहाती । गोविंद दामोदर माधवेती ।।१।।
प्रभातकाळी सह्यांचळाशी । उपहुङ झाला प्रभु राऊळाशी ।
मुनीवृंद उभे रायांगणाशी । सुरवर दुदुंभी गर्जे आकाशी ।।२।।
प्रातःसमयी श्रीचक्रपाणि । फलस्थग्रामी जनकाइ धामी ।
रंभाइसाचा निज प्रिय त्राता । जीवास चिंती सदा हितकर्ता ।।३।।
उषांतकाली प्रभू ऋद्धपूरी । स्वच्छंद निघे कृपया विहारी ।
नासूनी दुःखे विमला कृमीचे । करी प्राप्त स्वामी अधिकार त्यांचे ।।४।।
पश्चात प्रहरी तो राजविहारी । चिंतीत जीवा सदा हितकारी ।
नागांबा प्रश्ने प्रभू थाप चिंती । रूपांबा प्रश्ने तो जीव चिंती ।।५।।