मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

आरती श्रीचक्रधर प्रभू महाराज

आरती · उठा उठा श्री चक्रधराया

उठा उठा श्री चक्रधराया, भक्त वाट पहाती ।

पदरी घेऊनी, पवित्र करुनी, भक्ती देई जो जी ।।धृ।।

 

धरणी आशंसिली, स्पर्श व्हावया, आपुल्या श्रीचरणाचा ।

विरहाग्निने, तप्त जहाली, शीतळ कीजो जी ।।१।।

 

प्राण उतटुनी कंठा यावा, आर्त नाही तैसी ।

औदार्याचा, सिंधु माझा, प्रेम देई जो जी ।।२।।

 

प्रातःकाळी प्रभूजी उठले, कृपा दृष्टी वळली ।

तळमळ करीते, भक्त तारिले, तैसे तारी जो जी ।।३।।

 

अनंत सृष्टी हिंडत आलो, बहु श्रम आला जी ।

कठिण कोरडा, कधी मी तुमच्या, पदरी पडेन जी ।।४।।

 

अनंत वेळा, प्रमाद जोडूनी , खंती आणिली जी ।

ऐसा मी अपराधी कैसा, योग्य होईन जी ।।५।।

 

अनिमित्त बंधु, महादानी तू, औदार्य रावो जी ।

पाहू नका तुम्ही अपात्रता ही, वरदान द्या हो जी ।।६।।

 

कवीने आपुले सुगंधहीन, हे पुष्प वाहिले जी ।

सुगंधहीन ते सुगंधी करुनी, करी घेई जो जी ।।७।।