जाय जाय झोपी बाळा, रात्र फार झाली रे ।।धू।।
रत्नजडित पाळण्यात, का न तुजसी निद्रा येत ।
हलवी प्रभू तुज व्रजललना, झोप घेई घेई रे ।।१।।
चंद्र ढळला माध्यावरूनी, पशुपक्षी निजले रजनी ।
मंद मंद वारा येतो, झोप घेई घेई रे ।।२।।
प्रार्थितसे प्रभू गोविंद, शिशु कृष्ण तव पदकुंद ।
भावगीत सुमने अर्पी, झोप घेई घेई रे ।।३।।