मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

निद्रेच्या आरत्या

आरती · निज बा निज माझ्या चक्रधरा

निज बा निज माझ्या चक्रधरा ।

मालनी निज कुमारा । निज ... ।।धृ. ।।

भवर मंचकी शेज फुलांची । केली तुज सुन्दरा । निज... ।।१।।

ज्ञानिये भक्त अवसरा मिनले । विनविती तुज गुर्जरा । निज... ।।२।।

अहोरात्र ही सकळ जीवांची चिंता तुज ईश्वरा । निज... ।।३।।

परावराचे करुनी निरुपण श्रम आला प्रभुवरा । निज... ।।४।।

तन मन धन कर्पूर लावुनी आरती करी द्विजवरा । निज... ।।५।।

आबाकुमर म्हणे कृपा करुनी मज प्रेम द्यावे किंकरा । निज... ।।६।।