तुम्ही आरोगणा स्विकारा स्विकारा
भक्ती, मुक्ती सुखदायक देवा । जय नमो पंच अवतारा ।।धृ।।
विदुर करण्याचे भोजन केले मोठ्या प्रेम भराने ।
सुदाम पोहे आणि द्वोपदीची भाजी ती आवडीने ।
सेवन केली त्यासम आता । श्रीकृष्ण अवतारा ।।१।।
राणी मदळसा नित्य-दिनी घरा भिक्षा मागून येणी ।
आत्मऋषींची विनंती मानून दैनिक भोजन करीसी ।
तणीच आमच्या रुक्षान्नाची । दत्तात्रेय अवतारा ।।२।।
सहस्र भोजन विप्राचे परिपूर्णपणे तु स्विकारीले ।
आणि द्विजाचे श्राद्ध जेउनी त्याचे पुर्वज उद्धरीले ।
कृपा करूनी त्यासम आता । चक्रपाणी अवतारा ।।३।।
अबाइसाच्या गोड पुर्या तु आरोगिल्या प्रेमानी ।
तिकोपाध्याचे भोजन केले त्यांचे घरी जाउनी ।
तशीच आमुची निर्गुण ब्रह्मा । गोविंद प्रभू अवतारा ।।४।।
पाणीभात हा रूक्ष तरीपण स्विकारीला बाइसाचा ।
बोणोबाई उपहार प्रतिदिनी अंगीकारीला त्यांचा ।
दामोदर म्हणे त्यासम देवा । चक्रधरा अवतारा ।।५।।