नमो पंचअवतार करा हो । आरोगणा स्वीकार ।।धृ।।
मज गरीबाचे रूक्ष कदान्न । गोड करून घ्या होऊनी प्रसन्न ।
दाखवितो उपहार । करा हो आरोगणा ... ।।१।।
कृपा दृष्टिने अवलोकनी । उचिष्ट आपुला प्रसाद देऊनी ।
घडवावा अधिकार । करा हो आरोगणा ... ।।२।।
अनंत जन्मांचा मी अपराधी । अशुद्ध माझी क्रीया ही साधी ।
नका करू धिक्कार । करा हो आरोगणा ... ।।३।।
पतित पावन हे दीननाथा । पावन करूनी घ्यावे अनंता ।
आहे तुझा गुन्हेगार । करा हो आरोगणा ... ।।४।।
दामोदर हा सेवक आपुला । विनंती करीतो तव चरणाला ।
नमितो मी वारंवार । करा हो आरोगणा ... ।।५।।