मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

उपहार (भोजन) आरती

आरती · पंचअवतार तुम्ही आरोगणेला

पंच अवतार तुम्ही आरोगणेला । 

बीजे करावे मम सदनाला ।।धु।। 

 

मी दीन दुर्बल दास तुमचा हो । 

पावन करावे मज पतिता हो ।।१।। 

 

विनंती माझी तुम्ही अंगिकरावी । 

आरोगणा मम नित स्वीकारावी ।।२।। 

 

प्रसन्न होऊनी मज प्रसाद द्यावा । 

अशुद्ध जीव मम शुद्ध करावा ।।३।। 

 आबाकुमार क्षिती भावी मनाला । 

प्रेमदान द्या मज गरिबाला ।।४।।