मुख्य मजकूराकडे जा
🙏🏻 || दंडवत प्रणाम || 🙏🏻 9658745874 krushnaisocialfoundation01@gmail.com
← साहित्य

पंचावतार नमन

आरती · माझी विनंती अविराज

माझी विनंती अविराज स्वामी गरूडध्वजा ।।धु।।

निर्गुण निरामया निराकारा माया परात्परा ।

साधुसंताच्या माहेरा विश्वाच्या आवधारा ।

प्रेमळ भक्तीच्या प्रियकारा रूक्मिणीच्या वरा ।

आदि सृष्टीच्या मूळ बीजा स्वामी गरूडध्वजा ।।१।।

 

वसुदेव देवकीचे तप भारी समुद्राचे परी ।

श्रावण वद्य पक्षी आवधारी रोहिणी नक्षत्री ।

तिथी अष्टमी बुधवारी अवतरले श्रीहरी ।

वसुदेव घेऊनिया कडेवरी नेले नंदमंदिरी ।

सेजे पहुडविले महाराजा स्वामी गरूडध्वजा ।।२।।

 

जागृत होऊनिया नंदराणी पाहे कैवल्यदानी ।

स्वरूप लावण्य तेज तरणी न मावे गगनी ।

आल्या धावुनिया गवळणी गोकुळीच्या कामिनी ।

पुत्र मुख पाहिले नंदानी मधुबिंदु घालूनी ।

घरोघरी आनंदल्या सकळ वृजा स्वामी गरूडध्वजा ।।३।।

 

सुकृत गवळ्याचे अपार जैसे मेरू मांदार ।

वस्तु लाभली परात्पर मोक्षाचे माहेर ।

सकळ शास्त्राचे निजसार वेदाचे जिव्हार ।

ज्याला ध्यातसे उमावर हरिहर झाले स्थिर ।

ब्रम्हा येऊनिया करी पूजा स्वामी गरूडध्वजा ।।४।।

 

यशोदा मंदिरी पुतनारि नाना कौतुक करी । 

भोगुनी ब्रजाच्या सुंदरी भोगून ब्रह्मचारी । 

अनंत जीवाला उद्धरी भक्तांचा कैवारी । 

तो हा अवधारी नटधारी शरणागता तारी । 

मल्हारी शाहाबाच्या शिरताजा स्वामी गरूडध्वजा ।।५।।