रुक्मिणी आर्जव करी विडा घ्या जयदेव । महाराज विडा घ्या
जयदेवा श्रीहरी ।।धृ।। आदिमुर्ती श्रीआदिनारायण सुरवर पन्नग
ध्याति । वेद पुराणे नारद तुंबर तुमच्या लीळा गाती । क्रिल्मिषमिषना
समान असना दोषची विलया जाति । मी करीते प्रार्थना विडा घ्या
यदुजनका श्रीपती । नाना नट अवतारी अहो तुम्ही नाना । महाराज
अहो तुम्ही नाना नट अवतारी ।।११। विवेक पेटारी शांति नागवेल
पिकले कवळे आसू । प्रपंच पान थपथपीत अनुभव रूमालाला पुसू ।
अष्ट पाकुळका शिरा काढल्या द्वैत टाकले निसून । विकल्पाचा देठ
खुडविला निश्चळ चवकी बसून । पान घेऊन गंगेरी हातामधी पान ।
महाराज हातामधी पान घेऊन गंगेरी ।।२।। मी पण जाळोनि सांधो
सांधी ठीक लाविला चुना । राव रंक सम समान आहे जरा अधिक ना
उणा । स्वयं प्रकाश अडकित्ता सुपारी फोडीली वासना । भावार्थ
कर्पूर घोळीला संत जाणतील खुणा । खूषबोय घालुनि शिरी लीनता
खूषबोय । महाराज लीनता खूषबोय घालुनि शिरी ।।३।। विवेकरंगी
काथ रंगीला प्रीत बहूदी चाले । क्षमा लवंगा वैराग्य जायफळ सुरस
बहू आमुले । सत्कीर्तीचे वेलदोडे खुणवोय युगायुगी चाले । आशा
पत्रीयुक्त त्रयोद्ष घ्या तुम्ही चांगले । ज्ञान दीपक मंदिरी प्रकाशूनि
ज्ञान । महाराज प्रकाशूनि ज्ञान दिपक मंदिरी ।।४।। निजबोधाचा
पलंग टाकिला वारी पहुढा श्रीपती । नवविधा भक्तिचे विडे घ्या
तुम्ही आत्मप्रचिती । ब्रह्मरसाचा तांबुळ रंगला रुक्मिणी हात
वोळीगती । सवाई दल भीद म्हणे कितीक सोहळे संत सांगति । प्रेम
कविला हरि शेवटी प्रेम । महाराज शेवटी प्रेम कविला हरी ।।५।।
रुक्मिणी आर्जव करी विडा घ्या ।।