विडा घ्या हो चक्रधरा, स्वामी विडा घ्या हो चक्रधरा ।
भक्ती गंध हे लावूनी, भावपुष्प हे वाहुनी ।
करी मंगल पूजा, तुम्ही विडा घ्या हो चक्रधरा ।।थु।।
विशुद्ध सुंदर नागवेलीचे, पान तयावरती ।
श्रीफळ, पोफळ, निर्मळ, आलो घेऊनी हाती ।।१।।
खारीक, खोबरे, बदाम, जायफळ आणि वेलदोडा ।
विभिन्न फळ जातीसह, अपर्ण करीत विडा ।।२।।
तन हेची द्रव्य संपदा, अपर्ण करीत असे ।
स्वीकार करूनी घ्या प्रभु, तुम्हा मी विनवित असे ।।३।।
साष्टांगी प्रणिपात करितो विनम्र होऊनिया ।
दास दामोदर विनवी, श्रीचक्रधराया ।।४।।