बीडी अवस्थान श्रीजगदिशा अवसर गजराचा । प्रभूला ।
चारी मासामध्ये पूर्वकाळ आला पावित्याची ।।थु।।
डोमेग्राम नगर सोडुनी विचरत वसुधेसी । खरोखर विचरत वसुधेसी ।
नानापरी गोदातीरी उद्धरी जीवराशी । महा अपूर्व वर्धन नगरी आले
ऋषिकेशी । खरोखर आले ऋषिकेशी । लक्ष्मीच्या देऊळी स्वामी
राहिले वेदमासी । परसनायक पुढे वैसले विनवित देवासी । विटक
दिधला स्वामी कारणे उपविष्ट गुणराशी । कर जोडुनी विनवी
स्वामीला धन्य तो दैवाचा । खरोखर धन्य तो दैवाचा ।।१।।
परसनायक पुढा बैसले होऊनिया स्थित । खरोखर होऊनिया
स्थित । आनंद झाला अंत:करणी बहु सुख वाटत । लक्ष्मीच्या चौकी
चांदवा होता लोंबत २। तुमचे ब्रह्म म्हणूनी बोलले परसनायकास ।
नागदेवे प्रश्न केला ब्रह्म कवणांत । म्हणावे ब्रह्म कवणांत ।
चांदव्याचा दृष्टांत देऊनी बुझविले त्याते । दीन दयाळू तू कृपाळू
स्वामी विश्वाचा । म्हणावे स्वामी विश्वाचा ।।२।।
चारी मास राहिले की स्वामी पर्वकाळ आला । पवित्र
पर्वकाळ आला । समस्त भक्तीजन होते आनंद वर्षला । सडा घालुनी
गंग भरूनी समारंभ केला । भक्तीजनी समारंभ केला । पत्र पुष्प केळ
नारळ भावार्थे भरीला । बहुमोलाचे वस्त्र आणुनी ओळगवी स्वामीला
। भरजरी ओळगवी स्वामीला । स्तुती करीत बहु अति विनोदे वितर्क
मावळला । वोळगविले वस्त्र हेत काय पुरला बासाचां । खरोखर
पुरला बासाचां ।।३।।
नानापरीची पुष्पे आणुनी गुंफिले हार । गुलाबी गुंफिले हार । बाहूभूषणे दोन्ही बाहू दंड हाती हातसर । गळदंडा श्रीकंठी मिरवे ऐमी मूर्ती सुंदर । प्रभूची मूर्ती सुंदर । तो अवसर पाहून मजला मनी हर्ष थोर । सुरनर किन्नर गायन करिती वर्णिती अपार । खरोखर वर्णिती अपार । आगम निगम भुलून गेले न कळे निर्धार । सुर दाटले गगनी वर्षाव करिती पुष्पांचा । प्रभूवर करिती पुष्पांचा ।।४।।
लक्ष्मीच्या देऊळी स्वामी राहिले येऊन । स्वामी राहिले येऊन । वेदाची परिमित तिथे स्थळी होय अवस्थान । पूर्वज आमुचे तिये स्थळी राहिले येऊन । दैव त्यांचे योग्य हेच पडले उपनाम । श्रीवर्धनस्थ बिडकरासी म्हणती तेथून । गुह्यार्थ होता उत्क केला बहुता कारण । सारंगधर सुत संतुदास किंकर श्रीहरिचा । विनवी किंकर श्रीहरिचा ।।५।।