विज्ञानशक्ति अवतरले । बहु दैत्य निर्दाळिले । विश्वरूप
प्रकटौनी अर्जुनदेवो बोधित । तया नमन श्रीकृष्णराया ।।१।। जो
चहुंयुगांचा अधिष्ठात्री । अमोदा सिध्दी जयाचां घरी । । तो
मातापुरी राज्य करी । तया नमन श्री दत्तात्रेया ।।२।। अवधूतवेष
क्रीडा करीति । सुपी पुजें भरूनी गोमतीयेमध्ये घालीति । । बावना
पुरूषां विद्यादान देति । तया नमन श्रीचक्रपाणी ।।३।।
आत्मरमणि रमति । नगरामध्ये क्रीडा करीति । कुमीते ब्रह्मपदां
नेति । तया नमन श्रीप्रभूराया ।।४।। जो शरणांगतां वज्रपंजरू ।
आर्तांचा उदारू ।। तो नमीन कृपेचा सागरू ।। श्रीचक्रधरू ।।५।।